Ajit Pawar On Welhe Name Change : पुणे जिल्ह्यातील (Pune) वेल्हे (Welhe)तालुक्याचं नामांतरण राजगड (Rajgad)असे करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. पवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता…
त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करण्याबाबतची लोकभावना तीव्र आहे. याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींपैकी 58 ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्याबाबतचे सकारात्मक ठराव दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्रामार्फत मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आणि महसूल मंत्री @RVikhePatil जी यांच्याकडे केली आहे. pic.twitter.com/66r98fxtWu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 27, 2023
वेल्हे तालुक्यामधील राजगड या किल्ल्याशी संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असल्याने या ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांनी 27 वर्षे शासन चालवले आहे, त्यामुळे वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे, अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे.
वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्ताऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड (Prachandagarh)या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापि, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असल्याने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे.
वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये असल्याने किल्ले राजगडवरुन या तालुक्याचे नामकरण राजगड करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.