Download App

भाजप 26 तर अजितदादा गटाला 22 जागा, फडणवीसांच्या जागावाटपावर अजित पवारांचं ‘नो कमेंट’

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडण्यात येत होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात जागा वाटपाचे गणित मांडून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजप २६ जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारल असता असता, त्यांनी दोनच शब्दात उत्तर दिलं.

ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य 

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकारण आणि तापलेल्या विषयांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूर होते. आज ते बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामतीत जनता दरबार घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जागा वाटपाविषयी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले. त्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. मी याबाबत काहीही स्टेटमेंट करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

फडणवीस का म्हणाले होते?
काल माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजप 26 जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार गट आणि शिवसेनेच्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली. उमेदवार निवडीसाठी गुणवत्तेसोबतच विद्यमान खासदारांचे पुनर्नामांकन हे मुख्य सूत्र असेल, असे ठरले, असं फडणवीस म्हणाले.

चीनमध्ये न्यूमोनिया संकट! भारत सरकार अॅक्शन मोडवर, राज्यांना दिले तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश 

दरम्यान, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात तेढ निर्माण झाली. यावर भाष्य करतांना पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. रोज वेगवेगळे नेते, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत. मात्र, समाजात वाद निर्माण करणारी,तेढ निर्माण करणारी वक्तव्ये कोणी करू नयेत. प्रत्येकाने आपली भूमिका मांडली पाहिजे. आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या पाहिजेत. सरकार त्यात लक्ष घालेल, असं त्यांनी दिलं.

दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. किती निधी मागवला आहे, हे आत्ताच मी सांगणार नाही. ज्यावेळेस सरकारची मदत मिळेल, त्यावेळेस मी सांगेन. पण ज्या ठिकाणी दृष्काळसदृश्य परिस्थिती आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारला खर्च करावा लागेल आणि त्याचा खर्च उचलायची राज्य सरकारची तयारी आहे, असं अजित पवार म्हणाले.

Tags

follow us