Ajit Pawar On Chhagan Bhujbal : जालन्यातील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भुजबळांच्या भूमिकेवर भाष्य केले. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य कोणीच करु नयेत, असा सल्ला दिला.
30 आणि 1 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जत येथे अधिवेशन शिबीर होत आहे. त्या अधिवेशनात आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की ‘सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा राजकारणाशी संबंध नसणारे असतील, प्रत्येकाने थोडी सावध भूमिका घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य कोणीच करू नयेत. याबाबतची खबरदारी घेणं ही काळाची गरज आहे.’ मात्र छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? याबाबत त्यांनी कोणतेही थेट वक्तव्य केलं नाही.
बुलढाणा : रविकांत तुपकर यांना अटक; सोयाबिन, कापसाचे आंदोलन चिघळण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटला आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर जायकवाडीत पाणी सोडण्यात आले. या संघर्षावर ते म्हणाले की पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याची गरज आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न त्याचबरोबर कोयनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे, असे अजित पवार म्हणाले.
ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा द्यायला हवी.