Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वेगळं मत आहे, त्यावर आम्ही चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधीच पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणुक लागण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे. (Ajit Pawar spoke on the Pune Lok Sabha by-election)
विरोधकांच्या गोटात खळबळ! काँग्रेसच्या खेळीमुळे नितीश कुमारांनी ‘तो’ निर्णयच बदलला
यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्ष आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 जागांची चाचपणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही 48 जागांची चाचपणी करीत असून मुंबईत शरद पवारांची वेळ ठरवून पुन्हा चाचपणी करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? दिल्लीत ठरलं सुत्र, शिंदे-फडणवीसांनी काढला मुहूर्त
तसेच लवकरच पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची पोट निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच निवडणूक जाहीर होण्याआधीच कोणी कोणती जागा लढवावी त्यावर लवकरच विचार करुन निर्णय घेणं चांगलंच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…
दरम्यान, चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर तर काँग्रेसचेच खासदार होते. त्यामुळे चंद्रपूरचा काही विषय नाही ती जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, पण पुणे लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अन् कॉंग्रेसचं वेगळ मत आहे. त्यावर आम्ही चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. तर दुसरीकडे काँग्रेसचे एकमेव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे.