Download App

Amrita Fadnavis : मी गाणं म्हणणार नाही; अमृता वहिनींनी घेतला ट्रोलर्सचा धसका

Amrita Fadnavis : गाणं नाही म्हणणार नाही, माझा आवाज आज खराब आहे, आज मला ट्रोल व्हायच नाही, असं म्हणत अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी ट्रोलर्सचा धसका घेतल्याचे दिसून आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir) झाल्यानंतर अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना गाण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आज मला ट्रोल व्हायच नाही असं म्हणतं गाणार नसल्याचं सांगितलं.

आजचा दिवस खूप सुंदर होता, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. आज रामलल्ला विराजमान झाले आहेत. हृदय मोठे ठेवा आणि आजचा दिवस साजरा करा, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त पुण्यात शोभायात्रा काढण्यात आली होती. पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत अमृता फडणवीसही सहभागी झाल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये मागे घ्यावीत, रोहित पवारांची मागणी

निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन कुटुंबासह दर्शन घेतले. त्यांनी गोदातीरी आरतीही केली. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी उद्धव ठाकरे यांना फॉलो करत नाही, त्यांच काय चाललंय ते मला माहिती नाही, असंही त्या म्हणाल्या.

उल्हास पाटलांनी लेकीसाठी भाजपची वाट धरली… पण रक्षा खडसे, अमोल जावळे आधीच तिकीटाच्या स्पर्धेत!

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम नागपुरातील रामनगर येथील मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या समर्पण सोहळ्याचे LED स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले जेणेकरुन प्रत्येकाला तो क्षण अनुभवता यावा आणि पाहता येईल. देवेंद्र फडणवीस यांनी हा सोहळा थेट तेथेच पाहिला. तसेच यावेळी श्री रामजन्मभूमी ट्रस्टतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारसेवक म्हणून गौरव करण्यात आला.

follow us