पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, रिक्षाचालकाचे दुर्दैवी कृत्य

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या (molestation) घटना वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (University Pune) परिसरात एका तरुणीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही तरुणी […]

Untitled Design (11)

Untitled Design (11)

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या (molestation) घटना वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (University Pune) परिसरात एका तरुणीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही तरुणी आणि महिलांसाठी असुरक्षित वाटू लागेल आहे. मूळची पश्चिम बंगालची 18 वर्षीय तरुणी शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहे. ती कोथरूड एमआयटी कॉलेजपासून पुणे विद्यापीठाकडे रिक्षामधून जात होती. या प्रवासादरम्यान खुद्द रिक्षा चालकांने या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. झालेला प्रकार तरुणीने पोलिसांना सांगितल्यानंतर आरोपी रिक्षा चालकावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

Breaking! अहमदनगर छावणी मंडळाची निवडणूक अखेर रद्द; इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची पश्चिम बंगाल येथे राहणारी आहे. तरुणी आरोपी सचिन नावाच्या अनोळखी रिक्षा चालकाच्या रिक्षामधून कोथरूड येथील एमआयटी कॉलेजपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जात होती. दरम्यान, या रिक्षा चालकाने रिक्षा पुणे विद्यापीठामध्ये थांबवत तिचा हात पकडला आणि जवळीकता साधत तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तरुणीने त्याला विरोध करत रिक्षा मधून खाली उडी मारली. मात्र, तरी देखील त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल घेऊन त्याचा स्वतःचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून दिला. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version