दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार (Firing) करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून 5 जणांना घेतल्याची माहिती मिळत आहे. धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली असून चारही आरोपी देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
आज देशाचा अर्थसंकल्प! पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काही संशयितांची नावं आम्हाला दिली होती. या नावांप्रमाणं वारजे पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम करून या पाचही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वडगाव, धायरी, कर्वेनगर, वारजे या भागातील असून त्यांना मुंबई क्राईम ब्राँच यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढील तपास मुंबई पोलिसांची टीम करत आहे. यांचा कुठल्या गँगशी संबंध आहे का, याचा देखील तपास सुरू आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
