Download App

Pune : संतप्त PMPML चालकाचा प्रताप; वाद झाल्याने गाडी रिव्हर्स घेत चारचाकीला धडक

पुणे : पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत चालणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस चालक आणि वाहक यांच्या आरेरावीचे आणि प्रकार सातत्याने समोर येत असतात. यातच एका बस चालकाने रागाच्या भरात दोन चारचाकी गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यात दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी निलेश ज्ञानेश्वर सावंत या बस चालकावर चतुश्रृंगी पोलीस स्थानकात कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. (Angry PMPML bus driver to two four-wheelers
Hit hard)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (21 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास, कोथरूड डेपोची एनडीए गेट ते चिंचवड गाव ही बस घेऊन शनिवारी एक वाजण्याच्या सुमारास निलेश ज्ञानेश्वर सावंत हा चालक चिंचवड गावच्या दिशेने जात होता. बस सेनापती बापट रोडवरील रत्ना हॉस्पिटल येथे आली असता एका कारला घासली. वेडी वाकडी बस चालवल्याने बस घासून गेली, असा दावा करत संबंधित कार चालकाने पुढील चौकात बस चालक निलेश सावंत याला विचारणा केली. यावेळी बस चालक आणि कार चालक या दोघांचा शाब्दिक वाद झाला.

“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

याचा राग बस चालकाच्या डोक्यात गेला आणि कोणताही विचार न करता बस चालकाने प्रवाश्यांनी भरलेली बस ही रस्त्यावर रिव्हर्स घेतली. यावेळी बस शेजारी काही लोक उभी होते. यावेळीच बस रिव्हर्स घेताना बस एका चारचाकीला धडकली. मात्र त्यानंतर बस मधल्या लोकांना आरडा ओरडा केला आणि बस थांबली. त्यानंतर बस चालकाने बस पुन्हा पुढे घेतली.  काही लोकांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, संबंधित बस चालक हा दारुच्या नशेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

Tags

follow us