Download App

अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच गदारोळ

पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच भिडल्याचं दिसून आलंय. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.

Minister Dilip Walse Patil : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे दिलीप वळसे पाटलांच्या (Minister Dilip Walse Patil) समोरच कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरु होती. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.

बाळासाहेब थोरातांविरोधात थेट ‘अमित शाहंचा’ प्लॅन… गुजरातचे दोन ट्रबल शूटर संगमनेरमध्ये

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु होती. या सभेमध्ये दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी आम्हाला मंंचावर येऊ दिलं नाही, बसू दिलं नाही, वळसे पाटलांनी स्वत:चा प्रचार केला, हे घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले असल्याचा आरोप निकम यांनी केला. त्यानंतर वळसे आणि निकम यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जात खुर्च्या नाचवत हिनवू लागल्याचं दिसून आलं.

लाडक्या ‘गणराया’च्या आगमनासाठी पुणेकर सज्ज; 7 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात, वाहतुकीतही मोठा बदल

मंत्री वळसे पाटलांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा रंगतच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. मग देवदत्त निकमांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार करण्यात आला.

दरम्यान, देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळरावांनी केला आहे.

follow us