Download App

अश्विनी जगताप पोहोचल्या शासकीय रुग्णालयात, अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं

  • Written By: Last Updated:

चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. त्यानंतर त्या दिवंगत आमदार आणि आपले पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी वंदन करून कामाला लागल्या. आज त्यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला (Aundh District Hospital) अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांना धारेवर धरले. रुग्णालयातून नागरिक परत गेले नाही पाहिजेत, अन्यथा तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईल, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

आमदार अश्विनी जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयीतल सगळ्या परिस्थितीचा आणि सोयी सुविधांचा आढावा घेतला. जगताप यांनी ICU मध्ये जाऊन पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टर वेळेवर येतात का, तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात का आदी प्रश्न त्यांनी रुग्णांना विचारले. यावेळी रुग्णांना पूर्ण सेवा मिळत नसल्याचं त्यांनी जगपाप यांनी सांगितले. त्यामुळे अश्विनी जगताप यांनी थेट तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रुग्णालयाची दुरावस्था आणि रुग्णांची गैरसोय सहन करणार नाही, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

जगताप यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, रुग्णालयातून नागरिक परत गेले नाही पाहिजेत. अन्यथा तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईल. मी पुन्हा रुग्णालयाला भेट देईल, असा सज्जड दम त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. हे सर्व पाहता अश्विनी लक्ष्मण जगताप या अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.

Karanatak : परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हिजाब घालावाच लागणार

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या नुकत्याच झालेल्या चिंचवड पोटनिवडणूकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला. मात्र, आमदार होऊन काही तासच उलटले असताना जगताप या ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

Tags

follow us