Download App

धनवेचा खून पूर्व वैमनस्यातूनच; पोलिस अधीक्षकांनी सांगितली कहाणी

Avinash Dhanve Murder Case : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलमधील गोळीबार प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार अविनाश धनवे (Avinash Dhanve Murder Case) याचा खून झाला. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. अविनाश धनवे याच्या खूनाची घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा दुजोरा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

Train Derail : साबरमती-आग्रा सुपरफास्टची मालगाडीला धडक, 4 डब्बे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू

गोळीबाराच्या घटनेमध्ये सराईत गुन्हेगार असलेला अविनाश धनवे याचा मृत्यू झाला आहे. धनवे हा दि. 16 रोजी आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हापासूनच संबंधित आरोपींकडून त्याची रेकी सुरु होती. धनवे हा रात्रीच्या सुमारास इंदापूरच्या जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला असता, त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. या हल्ल्यात धनवेचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

‘शिवतीर्था’वर ‘इंडिया आघाडी’ची तोफ धडाडणार! ‘हा शिवसेनेसाठी काळा दिवस’ CM शिंदेंची बोचरी टीका

या घटनेनंतर पोलिसांकडून तत्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासाअंती दोन्ही टोळींमध्ये आपआपसांत स्पर्धा सुरु असल्यानेच अर्थात पूर्ववैमनस्य असल्यानेच ही घटना घडली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनेप्रकरणी पोलिसांकडून काल रात्री चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील इतर चार आरोपी पसार आहे. त्यांनाही लवकरात अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अविनाश धनवे याच्यासह हल्लेखोरांवर खून, मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

या हत्येचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही समोर आले आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे हा त्याच्या तीन मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला होता. त्यावेळी हॉटेलमध्ये दोघे आले. त्यातील एकाचा हातात प्लॅस्टिकची पिशवी होती. दोघांनी पिस्तूल काढून थेट धनवेच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. भीतीने त्याचे तीनही मित्र बाजूला पळाले. त्यानंतर आणखी पाच सहा जण बाहेरून आले. त्यांच्या हातात कोयत्यासारखे शस्त्र होते. त्यांनी सर्वांनी जखमी धनवेवर वार करण्यास सुरुवात केली. या घटनेत धनवेचा मृत्यू झाला.

follow us