Construction Of Nagar Road-Vadgaonsheri Regional Office building : नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या (Vadgaonsheri Regional Office) नवीन इमारतीचे काम सुरू आहे. ते काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना बापूसाहेब पठारे यांनी दिल्या आहेत. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या रखडलेल्या कामाचे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी (Bapusaheb Pathare) शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी पाहणी केली. विमाननगर येथे गेल्या 8 वर्षांपासून या इमारतीचे काम चालू आहे. निधीअभावी हे काम रखडले असल्याचे सांगितले जाते.
कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका; सुनावणीत नेमके काय घडलं? वाचा सविस्तर
सन 2016 मध्ये कामाला सुरुवात झाली होती. अद्यापही हे काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. यावर कार्यवाही करण्याचे उद्देशाने आमदार बापूसाहेब पठारे यांनी ही पाहणी केली. पाहणीदरम्यान, सीमा भिंतीचे (Pune) तसेच फर्निचरचे आणि आजूबाजूच्या भागात भराव टाकण्याचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आले. यावर पठारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या.
पाहणीदरम्यान पठारे म्हणाले, “जुन्या इमारतीत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाला जागा अपुरी पडते आहे. परिणामी, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परंतु, गेल्या आठ वर्षांपासून नूतन इमारतीचे काम पूर्ण न झाल्याचे आश्चर्य वाटतेय. पण, आता प्राधान्याने हे काम हातात घेणे गरजेचे असून संबंधित अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया काढून कामाला सुरुवात करण्यास सांगितले आहे. लवकरच नूतन इमारतीत क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सुरू होईल.” यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झालेत. तर सुनील टिंगरेंचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात ही भेट होती. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती बापूसाहेब पठारे यांनी दिली होती. तर भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पठारेंनी केला होता.