मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका दाखल, परळी बंद
Walmik Karad Court Hearing 14 Days Judicial Custody : खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला खंडणी मागणी प्रकरणात न्यायालयात आज हजर करण्यात आलं. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जातेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh Case) आला असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप
या सुनावणीवेळी न्यायालयात सीआयडी अधिकारी अनिल गुजर आणि सचिन पाटील देखील हजर होते. यावेळी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सीआयडीच्या बाजूने युक्तिवाद केलाय. सुनावणीत नेमकं काय-काय झालं ते जाणून घेऊ या. यावेळी सरकारी वकिलांनी 10 दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी केलीय. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाला असून परळीतील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.
न्यायालयात आज वाल्मिक कराड यांच्याकडून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केलाय. ठोंबरे यांनी सांगितलं की, वाल्मिक कराड मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. अजून कोणता तपास बाकी आहे? असा सवाल त्यांनी केलाय. बॅंक खात्याची चौकशी करण्यासाठी आरोपीची गरज नाही. कराडची 14 गु्न्ह्यांमधून निर्दोष मुक्कता झालीय. मग आता त्या गुन्ह्यांचा तपास करायचा का? असा प्रश्न देखील ठोंबरे यांनी न्यायालयात उपस्थित केलाय. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड दोघे 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होते. तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी केली नाही? या 15 दिवसांत पोलिसांनी काय केलं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
VIDEO : संतोष देशमुखांची हत्या, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? धसांनी केला मोठा गौप्यस्फोट
संतोष देशमुख खंडणी प्रकरणामध्ये आज वाल्मिक कराडला न्यायालयात आणलं गेलं. या प्रकरणात सरकारी वकीलांनी देखील कोर्टात युक्तिवाद केलाय. सरकारी वकिलाने म्हटलं की, ‘आम्हाला वाल्मिक कराडचा हत्येत असलेला सहभाग तपासायचा आहे. त्यामुळे कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपास अधिकाऱ्यांनी घेतलेय. देशाबाहेर अन् देशात कराडने मालमत्ता जमवली आहे का? याचा तपास आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी दहा दिवसांची कोठडी द्या, अशी मागणी त्यांनी केलीय.