Baramati Loksabha : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बारामतीची लढत अधिकच रोचक बनणार असल्याचं दिसून येत आहे. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे.
‘काँग्रेस’च्या नाराजीचा इफेक्ट; ‘त्या’ मतदारसंघाच्या अदलाबदलीत कुणाला बसणार धक्का?
मागील काही दिवसांपासून सुरु असलेली चर्चा अखेर ठरली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर बारामती लोकसभेतून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार याच उमेदवार असल्याचं बोललं जात होतं. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही लढत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणाऱ्या नणंद-भावजयीच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच असतानाच आता सुनंदा पवारांची चर्चा सुरु झाली आहे.
शेअर बाजारात ‘आपटीबार’; गुंतवणूकदारांना धक्का, इराण-इस्रायल तणावाचा दिसला मोठा इफेक्ट!
महाविकास आघाडीकडून सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज का घेतला असावा? असा सवाल सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत असतानाच जर या मतदारसंघात काही कारणास्तव उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिकचे उमेदवारी अर्ज घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून महायुतीकडून सुनेत्रा पवार, अजित पवार , तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि सुनंदा पवार यांच्या नावे उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सचिन दोडके यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाराष्ट्रातील 11 जागांसाठी कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, लातूर, धाराशिव, बारामती आणि रायगड या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे.