‘काँग्रेस’च्या नाराजीचा इफेक्ट; ‘त्या’ मतदारसंघाच्या अदलाबदलीत कुणाला बसणार धक्का?

‘काँग्रेस’च्या नाराजीचा इफेक्ट; ‘त्या’ मतदारसंघाच्या अदलाबदलीत कुणाला बसणार धक्का?

Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सगळंच काही फिलगुड नाही (Lok Sabha Elections) याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. काँग्रेससाठी फक्त दोनच जागा सोडल्या. ठाकरे गटाच्या या दादागिरीवर काँग्रेस नेतेही चांगलेच खप्पा झाले. त्यांनी नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली. थेट दिल्लीतील हायकमांडकडे कैफियत मांडली. निवडणुकीच्या आधी सुरू झालेली ही धुसफूस आधिक वाढून महाविकास आघाडीला तडे जाऊ नयेत यासाठी संभाव्य डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतदारसंघांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसं पाहिलं तर या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना तिकीट दिले आहे. परंतु, या जागेसाठी वर्षा गायकवाड यांनी थेट दिल्लीत फिल्डिंग लावली. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मतदारसंघाच्या बदल्यात ठाकरे गटाला उत्तर मुंबईची जागा मिळू शकते.

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

या मतदारसंघात ठाकरेंकडून विनोद घोसाळकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. घोसाळकर हे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना तिकीट दिले आहे. तसं पाहिलं तर अनिल देसाई उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात. पक्षफुटीनंतरही त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. मंत्रिपद मिळण्याची संधी त्यांना मिळाली होती. परंतु शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली.

आता पुन्हा त्यांना काँग्रेसच्या नाराजीचा फटका बसू शकतो. जर खरंच मतदारसंघाची अदलाबदल झाली तर राजकारण देखील बदलणार आहे. मग अनिल देसाई यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट देणार, त्यांचं पुनर्वसन कसं करणार की त्यांना यंदा तिकीटच दिलं जाणार नाही असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. मतदारसंघ अदलाबदलीबाबत अजून तरी कोणताच  ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.

Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज