Video: ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा आमदार टिंगरेंवर थेट आरोप

घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. डायनिंग टेबल नाही.

Video: ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा आमदार टिंगरेंवर थेट आरोप

Video: ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा आमदार टिंगरेंवर थेट आरोप

Supriya Sule on Sunil Tingre Porsche Accident : तुम्ही खुनी आहात. (Supriya Sule) रक्त बदलण्याचं पाप तुम्ही केलं. असा थेट आरोप करत पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर थेट टीका केली आहे. तुमच्या दोन्ही हातावर खून आहे. पोर्शे कार आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? असा प्रश्न उपस्थित करत जे दोन जीव गेले त्यांच्या आईचे आश्रू कोण पुसणार? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार, रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?

महाराष्ट्र तुमच्याकडे उत्तर मागतोय. मी तुमच्याकडं उत्तर मागत आहे. घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही असंही सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, त्या दोन जिवांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. अशी लोक वगडाव शेरीला लोकप्रतिनिधी हवे आहेत का ? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Exit mobile version