Baramati Namo Great job fair : राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा ( Baramati Namo Great job fair ) हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मात्र या मेळाव्या देण्यात येणाऱ्या नोकऱ्या आणि सबंधित कंपन्यांबाबत आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी फेसबुक पोस्ट करत पोलखोल केली आहे.
सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
या पोस्टमध्ये कुंभार म्हणाले की, बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता पुढे येऊ लागल्या आहेत.या मेळाव्यातून सुमारे ४३,००० लोकांना रोजगार मिळेल असे सांगीतले जात होते. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे रिक्त जागांचा तक्ता पाहिला तर यातील जवळपास ३०,००० (तीस हजार) जागा या नोकऱ्या नसून ट्रेनी पदे आहे.
यापैकी एक कंपनी Ligmus Pvt. Ltd. Bhosari, Pune ही १५,००० ट्रेनी घेणार आहे तर बारामतीची Giles Pvt. Ltd., १००० ट्रेनी घेणार आहे. एवढा मोठ्या प्रमाणावर ट्रेनी घेणाऱ्या या दोन्ही कंपन्यांची नांवे तक्त्यातून कॅापी पेस्ट केली आहेत. या दोन्ही कंपन्यांचा इंटरनेटवर काही आढळ झाला नाही. कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकते. Giles Pvt. Ltd ऐवजी Gils Pvt. Ltd ही कंपनी सापडली परंतु आश्चर्य म्हणजे या कंपनीच्या सर्व ९ स्त्री पुरूष संचालकांची नांवे D. Williamson आहेत. असं म्हणत या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेचे फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.
Kalasetu सांस्कृतिक कार्यविभागाचा विशेष अभिनव उपक्रम, पाहा फोटो
राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे या जिल्ह्यातील खासदारांनाही या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले आहे.
LokSabha election: महादेव जानकर माढ्यातूनच लोकसभा लढविणार; रासपच्या नेत्याने सांगितलं ‘प्लॅनिंग’
दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना शरद पवार यांनी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण नाकारले आहे. बारामती येथील कार्यक्रमानंतर दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत व्यस्ततेचा असल्याने यावेळी आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे शक्य होणार नाही, असे शिंदे-फडणवीस यांनी पत्र लिहून शरद पवार यांना कळविले आहे.