Kalasetu सांस्कृतिक कार्यविभागाचा विशेष अभिनव उपक्रम, पाहा फोटो

1 / 7

Kalasetu : मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यविभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी 'कलासेतू' या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 7

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.

3 / 7

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.

4 / 7

पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर, वितरक समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी बोलतं केलं.

5 / 7

‘मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने' या पहिल्या परिसंवादात ' १५०० हुन अधिक चित्रपट तयार होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

6 / 7

'शासकीय धोरण आणि वेबपोर्टल' या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी झाले होते.

7 / 7

या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज