Someshwar Election : भावकीचा वाद उफाळला! सुनेत्राताईंचं आवाहन धुडकावलं, युगेंद्र पवारांची मोठी घोषणा…

बारामतीच्या सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन धुडकावत युगेंद्र पवार यांनी पॅनेलची घोषणा केलीयं.

Yugendra Sunetra Pawar

Yugendra Sunetra Pawar

Someshwar Election : बारामतीत पवार कुटुंबियांच्या भावकीचा वाद अखेर उफाळून आला आहे. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गटृ-तट, भावकी-गावकी विसरुन एकत्र येत निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी मोठी घोषणा करत सुनेत्राताईचं हे आवाहन धुडकावून लावलंय. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट स्वतंत्र पॅनेल देणार असल्याची घोषणा पवार यांनी केलीयं.

अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंसह 4 जण ताब्यात; परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांची कारवाई

पुढे बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनेल करताना आम्ही सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करणार असून अनुभवी, नवीन व योग्य उमेदवारांना संधी देऊ. पवारसाहेबांशी चर्चा करुनच हा मोठा निर्णय घेण्यात आला असून नवीन चेह-यांना संधी द्यावी अशी सभासदांचीच भावना असल्याने त्याचा आदर करुन पॅनेल करण्यात येणार असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

तसेच कारखाना, सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, नवीन चेह-यांना संधी मिळावी आणि कारखाना अधिक सक्षम करण्याचा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढील दोन तीन दिवसात मुलाखती घेऊन योग्य ते उमेदवार आम्ही देऊ. बिनविरोधबाबत समोरुन काही प्रस्ताव अजूनही आलेला नाही, त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला तर तो पवारसाहेबांसमोर आम्ही तो मांडू, साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; “फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर”

दरम्यान, सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत एकीकडे भाजपकडूनही ताद लावण्यात आल्याची चर्चा सुरु असतानाच आता युगेंद्र पवार यांच्या घोषणेमुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबिय पुन्हा आमने-सामने येणार आहेत.

Exit mobile version