Download App

पुणे अपघात प्रकरणात अटकसत्र सुरूच; ससूनच्या डॉक्टरांनंतर आता शिपायालाही ठोकल्या बेड्या

पुणे हिट अँड रन प्रकरणात नवी अपडेट आली आहे. या प्रकरणात आता ससूनच्या डॉक्टरांनंतर आता येथील शिपायालाही अटक केली आहे.

Pune Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणाने या दोन-चार दिवसांत जोरदार वेग घेतला आहे.  (Pune Car Accident)या प्रकरणात रोज नवी घटना समोर येत आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या अटकेनंतर आता येथील शिपाायलाही या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. (Sassoon hospital) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत डॉक्टरांवर आहे. याच ब्लड सॅम्पल प्रकरणात डॉक्टरांना या शिपायाकडून पैशांची देवाण-घेवाण झाल्याचं उघड झालं आहे.

 

पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल, आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

शिपायामार्फत पैशांची देवाणघेवाण

डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची जी काही देवाण-घेवाण झाली ती या शिपायाच्या माध्यमातून झाली अशी माहिती समोर आली आहे. अमित घटकांबळे असं या शिपायाचं नाव आहे. अमित वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये रक्कम घेऊन आला होता असं तपासातून उघड झालं आहे. अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. तसंच, तो अतुल यांचा अतिशय निकटवर्तीय मानला जातो.

 

प्रतिनीधी पुण्यात दाखल

ही सगळी उलथा-पालथ या प्रकरणात सुरू असताना या अपघातात जी कार होती त्या पोर्शे कारचे प्रतिनिधी पुण्यात दाखल आले आहेत. पोर्शे गाडीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतून पुण्यात आले आहेत. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात या प्रतिनिधींकडून कारची तपासणी केली जात आहे. गाडीत तांत्रिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी पुण्यात आले असल्याची माहिती आहे.

 

मोठी बातमी! आमदाराच्या फोननंतर ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल; ‘हा’ आमदार कोण?

डॉक्टरांना अटक

आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी आज ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर यांना अटक केली आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावेळी अल्पवयीन मुलगा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवलं होतं. मात्र, याच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे.

follow us