Amol Balwadkar On Chandrakant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येऊ लागलेत, तसतसं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातलं वातावरण आता तापताना दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातील कोथरुड मतदारसंघातील भाजप पक्षांतर्गतला वाद चव्हाट्यावर आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते अमोल बालवडकरांनी (Amol Balwadkar) लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं. बालवडकरांच्या या आरोपांमुळे एकच चर्चा सुरु झालीयं.
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच; आमदार काळेंच्या ग्वाहीने उपोषण मागे
अमोल बालवडकर म्हणाले, भाजपमधील काही व्यक्तींमुळे पक्षाची लोकशाही धोक्यात आलीयं, भाजपच्या पक्ष निरीक्षकांची बैठक होती, पण या बैठकीचे मोजक्याच कार्यकर्त्यांना निरोप पाठवले गेले आहेत, भाजपमध्ये हे अपेक्षित नाही. बैठकीच्या निरोपासाठी अमोल बालवडकर आणि शाम देशपांडे यांचं नाव लिहू नये, असं फोन करण्यात आले आहेत, याउलट चंद्रकांत पाटलांचं नाव लिहावं असं सांगण्यात आलं असल्याचा गौप्यस्फोट बालवडकरांनी केलायं.
तसेच पक्षातल्या काही नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून आज गिरीश बापटसाहेब असते तर ही वेळ आली नसती. यासंदर्भात बोलण्यासाठी मला वरिष्ठांकडे जायंच आहे, पण माझ्या मतदारसंघातील नेते चंद्रकांत पाटील इतके मोठे नेते आहेत की त्यांचे वरिष्ठ कोण हाच प्रश्न पडत आहे, त्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेतली असल्याचं बालवडकर यांनी सांगितलंय.
मोठी बातमी : भारतीय संघाचा माजी कर्णधार ED च्या रडारवर; मनी लाँड्रिंग प्रकरणात धाडलं समन्स
तिकीट द्या, अथवा नाही, पण अशी वागणूक नकोय…
मागील 10 वर्षांपासून मी ज्या पक्षात काम करीत आहे, त्या पक्षातून मला दोन महिन्यांपासून बहिष्कृत करण्यात येत आहे. भाजपचे काही नेते माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत, माझ्या कार्यक्रमाला जायंच नाही, अशी तंबीही देण्यात येत आहे. या नेत्यांबद्दल आदर होता पण आता तो आदर निघून गेलायं, मला तिकीट द्या अथवा नका देऊ पण अशी वागणूक देऊ नका, असंही अमोल बालवडकर म्हणाले आहेत.
निवडणूक लढवण्यासाठी गिरीश बापट यांच्या मतदारसंघात देखील कार्यकर्ते इच्छुक होते, पण त्यांना अशी वागणूक कधी मिळाली नाही पण मला अशी वागणूक का दिली जातं आहे? तुम्हाला अहंकार आला आहे. भाजपची लोकशाही संपवण्याच काम पुण्यात केलं जातं असून याचा मी निषेध करतो, आता पक्षाच्या झालेल्या सर्व्हेला मी किंमत देत नाही, अन्याय पक्षाकडून होत नाही, अन्याय एका व्यक्तीकडून होत असल्याचंही बालवडकरांनी सांगितलंय.
दरम्यान, राजकारणात जिवंत राहायला हवं, जिवंत राहण्यासाठी जे करावं लागेल ते करणार असून माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत मी 27 तारखेलाचं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे चंद्रकांत पाटील यांची तक्रार केली असून वरिष्ठ नेते येत्या रविवारी 6 तारखेला जनआशीर्वाद मेळावा घेणार आहेत, या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझी भूमिका जाहीर करणार असल्याचंही बालवडकरांनी स्पष्ट केलंय.