तेव्हा पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना सुरु होत्या, अजित पवार गटाकडून खळबळजनक आरोप
Amol Mitkari On Chandrakant Patil : पुन्हा एखादा पुण्यात (Pune) ड्रग्ज प्रकरण (Drug Case) चर्चेत आला आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर पोर्श अपघात (Porsche Accident Case) प्रकरणानंतर पोलिसांनी (Police) शहरातील अनेक पब्ज आणि बारवर कारवाई सुरु केली होती मात्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) एका पबमध्ये काही तरुण ड्रग्ज घेताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध घेत आहे.
ड्रग्ज प्रकरणावरून विरोधक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहे तर दुसरीकडे या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) जोरदार राजकारण पहिला मिळत आहे. पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जेव्हा मी पालकमंत्री होतो तेव्हा अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत असं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं तर आता अजित पवार गटाकडून चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
अजित पवार गटाकडून चंद्रकांत पाटील यांना अमोल मिटकरींने (Amol Mitkari) प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करत या प्रकरणात पाटीलांना प्रत्युत्तर दिला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
4 नव्या चेहऱ्यांना संधी अन् नवीन कर्णधार, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
माध्यमांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, सुरुवातील मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या नाहीतर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत. मात्र त्यानंतर पाटील म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना घडल्या आहे की मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.