Download App

पुण्यावरील मोठा धोका टळला, असे का म्हणाले मुरलीधर मोहोळ?; वाचा सविस्तर

Muralidhar Mohol On NIA Raid in Pune :  पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. यानंतर भाजपचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

भाजप सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री अमित शाह जी यांच्या कणखर नेतृत्वाखाली दहशतवादी कारवायांना सतत आळा घालण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. पुण्यात देखील NIA ह्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली ज्यामुळे पुण्यावरील एक मोठा धोका टळला, असे ते म्हणाले आहेत.

तसेच आपल्याला २००४-१४ हे काँग्रेस शासन करत असतानाचे दिवस आठवत असतील जेव्हा सुरक्षित शहर मानल्या जाणाऱ्या पुण्यात २ वेळा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि शहरातील नागरिकांमध्ये भय वाढत गेले. पण मोदी सरकार आल्यापासून आता नागरिकांना सुरक्षित वाटत आहे. कारण भारताचे अंतर्गत सुरक्षा धोरण आता मजबूत हातात आहे. त्यामुळे पुणेच काय पण सर्व देशात सुरक्षिततेची भावना आहे.

NIA Raid : पुण्यात मुस्लिम तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण…

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर प्रशिक्षणात मुस्लिम समाजातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं उघड झालं असून एवढंच नाहीतर पीएफआय संघटना दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याचंही समोर आलंय. या ठिकाणी मुस्लिम समाजातील तरुणांना हत्याराचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तसेच इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर शाळा आहे. शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेचा आणि प्रशिक्षण केंद्राचा काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.

 

Tags

follow us