NIA Raid : पुण्यात मुस्लिम तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण…

NIA Raid : पुण्यात मुस्लिम तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण…

पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे.

झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर प्रशिक्षणात मुस्लिम समाजातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं उघड झालं असून एवढंच नाहीतर पीएफआय संघटना दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याचंही समोर आलंय.

अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!

या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून याच ठिकाणी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला दिल्लीत सुरु आहे. एनआयएने 22 सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातल्या दोन मजल्यांची झडती घेतली होती. जप्त केलेल्या काही दस्तऐवजांनुसार या मालमत्तेचा वापर आरोपींनी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचं आढळून आलं.

Samantha Ruth Prabhu: “सामंथाचं करिअर संपलंय, ‘या’ निर्मात्याचा मोठा खुलासा

या ठिकाणी मुस्लिम समाजातील तरुणांना हत्याराचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तसेच इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर शाळा आहे. शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेचा आणि प्रशिक्षण केंद्राचा काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विद्येच्या माहेरघरात अशा प्रकारे दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याची बातमी समोर आल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube