भोंदूबाबाने कोणत्या दोन नेत्यांचे बळी घेतले? भाजप नेते काकडेंचा धक्कादायक दावा

काही लोक आपल्याला मोठ काहीतरी मिळेल या भावनेने जातात, तसेच अनेक लोक गेल्याचं मी पाहिले आहे.

Sanjay Kakde

Sanjay Kakde

अशोक खरात बाबाला मुगल लोक जी शिक्षा देत होते तशी शिक्षा दिली पाहिजे. रस्त्यावर घेऊन त्याला दगडाने ठेचून मारलं पाहिजे. (Kharat) असं केल्याशिवास मला वाटत नाही देशभरात हे थांबेल असं म्हणत अशोक खरात प्रकरणावर थेट आणि परखड भाष्य पुण्याचे माजी खासदार भाजप नेते संजय काकडे यांनी केलं आहे. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायचं झालं तर ते आजपर्यंत कुठल्या बाबाकडं गेले नाहीत, स्व अजित पवारही कुठल्या बाबाकडं गेले नाहीत असं म्हणत, काही लोक आपल्याला मोठ काहीतरी मिळेल या भावनेने जातात असेही लोक आहेत. काही मुख्यमंत्री पदावरील लोकांनी या बाबांचे पाय धुतले असे काही कारनामे केले आहेत. परंतु, यांना काय मिळालं तर काहीच नाही असंही काकडे म्हणाले.

अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचं नाव घेत रुपाली ठोंबरेंनी केली मोठी मागणी

एखादा अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यावर तो कोणत्या टोकाला जाऊ शकतो याचा ही हिशोब नाही, असं म्हणत एका नेत्याला बाबा म्हणला तुझ्या घरावर पैशांचा पाऊस पाडतो असं म्हणून अनेक पैशांना लुटलं आणि तो नेताही त्याच्या आहारी गेला असंही काकडे म्हणाले आहेत. यावेळी मात्र काकडे यांनी कुठल्या बाबाचं नाव घेतलं नाही किंवा इतर कुठल्या बाबाचंही नाव त्यांनी यावेळी घेतलं नाही.

माझ्या आयुष्यात व्यवसाय चालवताना अनेक अडचणी आल्या. परंतु, कितीही मोठ्या अडचणी आल्या आणि त्या वारंवार आल्या तरी मी कुठल्याच बाबाकडं कधी गेलो नाही आणि कधी जाणारही नाही असं म्हणत काकडे यांनी या बाबाकडं जाण म्हणजे निव्वळ अंधश्रद्धेचा भाग आहे. परंतु, या गोष्टींच्या नादी लागून अनेक नेते भिकारी झालेले मी पाहिले आहेत असंही काकडे यावेळी म्हणाले.

Exit mobile version