Sunil Deodhar News : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेसला रामराम करत भाजपात आलेले अशोक चव्हाण आणि अजित गोपछड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील राजकीय मंडळींकडून त्यांचं स्वागत करण्यात आहे. निष्ठावंत मेधाताई कुलकर्णी यांना राज्यसभेच्या उमेदवारीचं स्वागत करत असून विजयासाठी शुभेच्छा असल्याची पहिली प्रतिक्रिया सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी दिली आहे.
किंग खानने ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024’च्या परिषदेत हॉलीवूडच्या कामाबद्दल थेटच सांगितलं, म्हणाला…
सुनील देवधर म्हणाले, संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या महिला धोरणानुसार पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असलेल्या मेधाताई कुलकर्णी यांना मिळालेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो. विजयासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असं सुनील देवधर म्हणाले आहेत. मेधा कुलकर्णी पुणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होत्या. त्यानंतर कुलकर्णी विधानसभेवरही निवडून गेल्या. सध्या त्यांच्यावर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
मागील अनेक वर्षांपासून कुलकर्णी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहेत.
Valentine Day : सर्वाधिक भारतीय कोणत्या भाषेत देतात प्रेमाची कबुली? उत्तर ऐकूण व्हाल शॉक!
काही दिवसांपूर्वी पुण्यातील पुलाच्या उद्घाटनावरुन मेधा कुलकर्णी यांना डावललं जात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन मेधा कुलकर्णी नाराजीही व्यक्त केली होती. या नाराजीबद्दलच्या बातम्यादेखील प्रसारित झाल्या होत्या. पुण्यात मागील अनेक वर्षांपासून काम करीत असल्याने सध्या भाजपात त्यांच्यावर अन्याय होत असल्याचंही सांगितलं जातं होतं. त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून थेट राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यावर बोलताना कुलकर्णी म्हणाल्या, पक्षांतर्गत काही गोष्टी असतात, सर्वच गोष्टी प्रसिद्धीसाठी नसतात, असं बोलून कुलकर्णी यांनी नाराजीवर सारवासारव केल्याचं दिसून आलं आहे.
चव्हाणांची एन्ट्री होताच भाजपनं राणेंसाठी सेट केला अवघड पेपर; यशस्वी होण्यासाठी लागणार कस
पुण्याचे प्रश्न संसदेत मांडणार…
पक्षाने संधी दिलीयं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा काम करण्याची संधी दिल्याबद्दल वरिष्ठांप्रती मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. तीन टर्म नगरसेवक एक टर्म आमदार म्हणून मी काम केलं आहे. आता राज्यसभेत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळणार आहे. दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली असून तिथं पुण्याचे प्रश्न मांडणार सोबतच इतरही जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.