Download App

मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही; अजितदादांसमोर ‘भाई’ गिरी करणाऱ्या भाजप आमदारांची स्पष्टोक्ती

  • Written By: Last Updated:

पुणे : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावणाऱ्या भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी मी कुणाच्याही कानाखाली लगावली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणालाही मारहाण केलेली नसून केवळ ढकललं असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. (Pune BJP MLA Clarification On Sasson Fight Incident)

NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं

काय म्हणाले कांबळे?

मारहाण करण्याच्या घटनेबाबत बोलताना कांबळे म्हणाले की, मी कुणालाही मारहाण केलेली नाही. समोरच्या व्यक्ती कोण आहे हे आपल्या माहिती नाही असे म्हणत मी का मारहार करेल असा उलट प्रश्न कांबळेंनी उपस्थित केला आहे. समोरच्या व्यक्तीशी माझे कोणते वाद नाही त्यामुळे त्याला मारहारण करण्याचा काही संबंध नसल्याचेही कांबळे यांनी घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.

कांबळे म्हणाले की, मी स्टेजवरून खाली उतरत असताना संबंधित व्यक्ती आडवी आली. त्याला ढकलून मी पुढे गेलो. मारामारी किंवा वाद घालायचा असता तर, तिथे थांबलो असतो. व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही नीट बघा असा म्हणत कानाखाली देण्याची एक पोझिशन असते त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा असा सल्ला कांबळेंनी पत्रकारांना दिला.

Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?

सातव यांना ओळखत नाही

दुसरीकडे मारहार झालेल्या सातव यांनी कांबळेंनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. परंतु मी सातव यांना आणि ते आपल्याला ओळखत नसल्याचे कांबळे म्हणाले. मी रूपाली चाकणकर यांच्याबरोबर चालत होतो. त्यावेळी चाकणकरांनी आमदारांना पुढे जाऊ द्या अशा सूचना उपस्थितांना केल्या. त्यावेळी सातव मध्ये येत होता. त्याला सिव्हिलमधी पोलिसांनी बाजूला घेतलं. त्यावेळी तेथे नेमकं काय घडल याची मला कल्पना नसल्याचे कांबळे म्हणाले.

मारहाण झालेले राष्ट्रवादीचे सातव कोण?

जितेंद्र सुरेश सातव असे मारहाण केलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राचे प्रमुख आहेत. आज (दि. 5) ससून रूग्णालयात तृतीयपंथीसाठी सुरू करण्यात आलेल्या वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार होते. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेवर आणि उद्घाटन बोर्डावर स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याने कॉन्टेलमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी थेट सातव यांच्या कानशिलेत लगावली.

Ship Hijacked: सोमालिया किनारपट्टीवर मालवाहू जहाज हायजॅक, क्रुमध्ये 15 भारतीयांचं अपहरण

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदार कांबळे यांनी सातव यांच्या कानशिलेत लगावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कांबळे यांनी केवळ सातव यांच्याच नव्हे तर, पायऱ्यांवरून खाली उतरताना एका पोलिसालादेखील मारहाण केली. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज