Bomb Threat To Pune Railway Station : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रेल्वे स्थानक (Pune Railway Station), भोसरी आणि नव चैतन्य महिला मंडळ याठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन आला आहे. त्यामुळे पोलीस शोध मोहीम राबवत आहे. अजूनपर्यंत त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु तपास सुरूच आहे. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार (Pune Crime) असल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली. पुणे रेल्वे स्टेशनसह पुण्यातील तीन ठिकाणे बॉम्बने उडवणार असल्याचं म्हटलं जातंय.
आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारासा पोलिसांच्या 112 या आपत्कालीन क्रमांकावर एक फोन आला. या फोनमध्ये पुण्यातील भोसरी, नव चैतन्य महिला मंडळ आणि पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे (Pune Police) पोलिसांनी लगेच अलर्ट मोडवर येत तात्काळ आढावा घेवून शोध मोहिम हाती घेतली आहे. या धमकीमुळे शहरात मात्र गोंधळाचं वातावरण आहे.
अवकाळीने होर्डिंग्ज बनले धोकादायक! नागरिकांच्या जीवितास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष
धमकीचा फोन कोणी केला? यामागे काय कारण होतं, याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक लोहमार्ग पोलीस, पुणे पोलीस, रेल्वे संरक्षण दल आणि बॉम्ब शोध पथक यांनी संयुक्तपणे धमकी दिलेल्या तिन्ही ठिकाणच्या परिसरात चौकशी केली (Pune News) आहे. श्वान पथक, बंड गार्डन पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या साहाय्याने राबवलेल्या या मोहिमेमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती मिळतेय. रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Video : ‘…असं फक्त पवारांचा पठ्ठ्याचं करू शकतो’; पुणे जलमय होताच रस्त्यावर केलं अनोखं आंदोलन
पोलिसांनी प्राथमिक तपासात ही धमकी बनावट असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु उल्हासनगर येथील एका महिलेने हा खोडसाळपणा केला असावा, अशी देखी शक्यता तपासली जात आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय. धमकीचा फोन कुणी आणि कुठून केलाय, याचा मागोवा पोलिसांचे पथक घेत आहे. ही घटना गंभीर स्वरूपाची असून पोलिसांनी देखील प्राधान्य दिल्याचं दिसतंय.