मुंबईकर दाखतील तुम्ही राहता की आम्ही; आशिष शेलारांचा ‘त्या’ विधानावरून ठाकरेंना टोला

मुंबईकर दाखतील तुम्ही राहता की आम्ही; आशिष शेलारांचा ‘त्या’ विधानावरून ठाकरेंना टोला

Ashish Shelar on Uddhav Thackeray : राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीत (Thackeray) लढल्या जाणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपाने बांधलेला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ५० जागाही येणार नाहीत, असा मोठा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे.

मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार

आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहे. ते म्हणाले होते की, देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवले आहे की, कोण कुठं आहे. उद्धव ठाकरे कुठे राहिले? एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल? असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावलाय.

लढणार आणि जिंकणारही

मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत. ५० पेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीत मिळतील, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईकरांचा सेवेकरी कोण? याच मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणूक होणार आणि महायुती जिंकणार, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

मतदारांचा मतदानापुरता विचार करणे हे भाजपचे धोरण नाही. मी मुंबईभर फिरतोय आणि ज्या प्रकारे मला दिसतंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईकडे पाठ दाखवली आहे. रोज बडबड करणाऱ्या उबाठा नेत्यांना मुंबईशी काही घेणेदेणे नाही. ते नाल्यांवर रस्त्यांवर कुठेही दिसत नाही. ते फक्त टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसून मते मिळतात हा गैरसमज आहे, अशी बोचरी टीकाही आशिष शेलार यांनी केली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube