Download App

Pune News :तुर्कीच्या सफरचंदावर बंदी, पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचा फोन

पुण्यातील व्यापाऱ्यांनीही तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांना धमकीचा फोन आल्याची घटना उघडकीस आली.

Pune News : तुर्कीने (Turkey) पाकिस्तानचे (Pakistan समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात ‘बॉयकॉट तुर्की’ (Boycott Turkey) अभियान सुरु झालं. पुण्यातील (Pune) व्यापाऱ्यांनीही तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांना धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा फोन पाकिस्तामधून आल्याची माहिती आहे.

पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक! पाकिस्तानी वस्तूंची ऑनलाईन विक्रीही बंद; अमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस 

अधिकच्या माहितीनुसार, पुण्यातील फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कीहून येणाऱ्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. इथून पुढे तुर्कीमधून कोणतेही फळ आम्ही आयात करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागले. झेंडे यांना एका अनोळखी नंबरवरून धमकीचा कॉल आला. याबाबत बोलताना झेंडे यांनी सांगितलं की, तुर्कीचे दोनशे ते अडीचशे फळांचे बॉक्स मी विकायचो. मात्र, तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्यानंतर आम्ही तुर्कीचे संफरचंद घेणार नाहीत अशी भूमिका घेतली. त्यानंतर 9 वाजून 13 मिनिटांनी मला धमकीचा फोन आला. मी कामात असल्याने कॉल उचलला नाही. त्यामुळं समोरून व्हाईस रेकॉर्डिंग पाठवण्यात आलं. त्यात तुम्ही पाकिस्तान आणि तुर्कीचं भारत काहीही करू शकत नाही, भारत काहीही वाईट करू शकत नाही,  असं फोनवरून सांगितलं आणि त्यांनी फोन कट केला.

शिर्डीत मोठी चोरी ! व्यापाऱ्याचं साडेतीन किलो सोनं अन् ४ लाखांची रोकड घेऊन ड्रायव्हर फरार 

पुढं झेंडे म्हणाले की, आमच्यात थोडीफार शिवीगाळ झाली. मात्र, आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुणे पोलिस आमच्यासोबत आहे. आम्ही असल्या फोन किंवा धमक्यांना घाबरत नसल्याचंही झेंडेंनी सांगितलं.

तुर्कस्तानला मोठा तोटा
सुयोग झेंडे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. भारताविरोधात सरळ पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला हा चांगलाच आर्थिक फटका आहे.  तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर अनेक ग्राहक हिमाचल आणि इतर भागातील सफरचंद खरेदी करणे पसंत करत असल्याचे झेंडे म्हणाले.

पुण्यात तुर्की सफरचंद ३ महिने विकले जातात. याची तीन महिन्यातील साधारण उलाढाल ही सुमारे 1200 ते 15000 कोटींची आहे. पण, तणावाच्या परिस्थीत तुर्कस्तानने भारताविरोधात उभे राहत पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यांची ही भूमिका पटणारी नसून, देशभक्ती म्हणून लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलाय आणि लोक डायरेक्ट सफरचंद खरेदीला विरोध करीत आहेत. पुणेकर व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे आर्थिक कोंडी होऊन तुर्कस्तानला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

 

follow us