शिर्डीत मोठी चोरी ! व्यापाऱ्याचं साडेतीन किलो सोनं अन् ४ लाखांची रोकड घेऊन ड्रायव्हर फरार

शिर्डीत मोठी चोरी ! व्यापाऱ्याचं साडेतीन किलो सोनं अन् ४ लाखांची रोकड घेऊन ड्रायव्हर फरार

Shirdi Crime : शिर्डीतील (Shirdi) एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोनं आणि चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (Vijay Singh Vasnaji Khishi) (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांनी फिर्याद दिली. चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावरच त्यांनी संशय व्यक्त केला.

‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढू देऊ नका, आरोग्य मंत्रालयाने दिला मेसेज; उपाय अमलात आणाच!

सविस्तर वृत्त असे की, खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ तारखेला रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हेही होते. ते हॉटेल साई सुनीतामध्ये मुक्कामी होते. खिशी हे अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोनं विक्रीसाठी जात. १३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमध्ये येऊन झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग रुममध्ये बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती. आणि ते आपल्या चाकल आणि कामगारसोबत रुममध्ये झोपले होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा, डोक्याला बंदूक लावून लुटली कोट्यावधींची संपत्ती 

दरम्यान, १४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलत त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता दरवाजा उघडा होता आणि हॉटेलमध्ये चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी आपली बॅग तपासली असता, त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले.

खिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, चालकानेच विश्वासत केल्याची तक्रार त्यांनी केली.

दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर,शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube