‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढू देऊ नका, आरोग्य मंत्रालयाने दिला मेसेज; उपाय अमलात आणाच!

‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढू देऊ नका, आरोग्य मंत्रालयाने दिला मेसेज; उपाय अमलात आणाच!

Fatty Liver : मानवी शरीरातील लिव्हरमध्ये (यकृत) फॅट जमा होण्याची समस्या (Fatty Liver) सर्व वयोगटात दिसून येत आहे. कमी वयातही ही समस्या निर्माण होताना दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आजच्या काळात ही समस्या कॉमन पण तितकीच गंभीर झाली आहे. जर यावर वेळीच लक्ष देऊन नियंत्रित केले नाही तर भविष्यात लिव्हर सिरोसिस, फायब्रोसिस आणि लिव्हर कॅन्सर यांसारख्या (Liver Cancer) घातक आजारांचा धोका राहतो.

आज ज्या पद्धतीने लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे यकृतात चरबी जमा होण्याची समस्या वाढली आहे. फॅटी लिव्हरमध्ये यकृताच्या पेशींमध्ये चरबीचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त होते. साधारणपणे लिव्हरमध्ये 5 टक्क्यांपेक्षा कमी चरबी असावी परंतु, जर हे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर फॅटी लिव्हर रोगाचा धोका असू शकतो.

देशात प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला धोका

आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते की देशातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. मधुमेह आणि मेटाबॉलिक कारणांमुळे मद्यपान करत नाही अशा लोकांमध्ये देखील या आजाराचा धोका वाढतो. अशा स्थितीला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हटले जाते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जंक फूड, तळलेले खाद्यपदार्थ, प्रोसेस केलेले खाद्य जास्त (Processed Food) प्रमाणात खाणे, शारिरीक निष्क्रियता, अपुरी झोप, अत्याधिक तणाव या कारणांमुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा त्रास वाढू शकतो.

काही अभ्यासांचे निष्कर्ष समोर आले आहेत. यानुसार लठ्ठपणा (Obesity) आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांमुळे सुद्धा लिव्हरमध्ये फॅट (चरबी) जमा होण्याचा धोका वाढतो.

एनएएफएलडी असणाऱ्या लोकांवर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे की या व्याधीने ग्रस्त असलेले 60 ते 70 टक्के लोक लठ्ठपणाला बळी पडू शकतात.

लठ्ठपणामुळे टाइप 2 डायबिटीस आणि इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वाढू शकतो. यामुळे यकृताच्या समस्या वाढण्याची धोका राहतो.

भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!

आरोग्य मंत्रालयाच्या काय सूचना

लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याची समस्या का वाढत आहे, यामागे काय कारणे आहेत याचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. यासाठी आपल्याच काही चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. यात सुधारणा केली तर फॅटी लिव्हरच्या समस्येचा निपटारा होऊ शकतो.

आपली रोजची दिनचर्या दुरुस्त करा असा मोलाचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. तसेच अपुरी झोप, धूम्रपानाची सवय, नियमित व्यायाम न करणे, जास्त वजन, एनर्जी ड्रिंक्स किंवा गोड पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन या कारणांमुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

उपाय लक्षात घ्या अन् अमलात आणा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते रोजच्या दिनचर्येत काही बदल केले तर ही समस्या आटोक्यात आणता येऊ शकते.

जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही 7 ते 10 टक्के वजन कमी करणे गरजेचे आहे.

हाय फायबर, कमी प्रमाणात कार्ब्स आणि कमी प्रमाणात फॅट असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.

आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा 150 मिनिट शारिरीक हालचालींच्या माध्यमातून फॅटी लिव्हरची समस्या कमी करता येऊ शकते.

मद्यपान करत असाल तर मद्यपान बंद करून यकृताच्या अनेक समस्यांपासून स्वतःचा बचाव करता येईल.

सावधान! एक क्लिकमुळे होवू शकता कंगाल, ‘या’ WhatsApp Scam पासून सतर्क राहा…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube