Cases will registered in Pune’s encroachment, excavation cases; Bawankul Angri on officials : पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे आदेश देण्यात आले. बैठकीला आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्यानेच वैष्णवीच्या बाळाची काळजी घेतली; हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टी मदत व बचाव कार्यासाठी ‘या’ जिल्ह्यांमध्ये NDRF, SDRF पथके तैनात
त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा.
इस्रायली सैन्याची मोठी कारवाई, हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, PM नेतन्याहू यांची घोषणा
दरम्यान अनधिकृत बांधकामांबरोबरच पुणे शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले आहेत. या विरोधात नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात होती. त्यावर शहरांमध्ये सर्वच भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्यांवर पादचारी मार्गांवर छोट्या-मोठ्या टपऱ्या, स्टॉल हे काढण्यात यावेत. अशा विषयी तक्रारी पुणेकरांकडून आयुक्तांकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले रस्ता, माणिकबाग, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, खराडी या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.