Download App

कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं..चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; शिंदे गटाचं वाढलं टेन्शन

(विष्णू सानप – लेट्सअप टीम)

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात जी उलथापालत होत आहे ते पाहता कधी काय होईल याचा काही नेम नाही. निष्ठेंच्या शपथा घेणारे आणि वर्षानुवर्ष सोबत असणारे सहकारी देखील रात्रीत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. यामुळे राजकारण्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न पडतो. राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकते, असे वक्तव्य करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी (chandrakant patil) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना संभ्रमावस्थेत टाकलं आहे. ते पुण्यात (BJP Pune) एका कार्यक्रमाच्यासाठी आले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही चर्चा नाही, बारीकशी सुद्धा शक्यता सुद्धा दिसत नाही. बंद खोलीत चर्चा नाही, ओपन मैदानातही चर्चा नाही. आपली अशी राजकीय संस्कृती आहे की आपण सभागृहात जरी किती भांडलो तरी बाहेर म्हणतो, चला चहा घेऊ. पण आता काही असे चॅन्सेस दिसत नाहीत. पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray : बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष!

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटीवरून भाजप सोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थपन केलं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड करत पुन्हा सरकार पडलं आहे. मात्र, या घटनेला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहे. या तीन वर्षानंतर पुन्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि भाजप नेत्यांनी आधीसारखं उद्धव ठकरेला टार्गेट करणं कमी केलं आहे.

…तर मालेगाव वाचलं नसतं; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या भुवया तेव्हा उंचावल्या जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात जात असताना काही वेळ चर्चा झाली. राजकारणातले एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे अशा हसत खेळत चर्चा करताना दिसल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असताना पाटलांनी असे वक्तव्य करून एकप्रकारे दुजोराच दिला आहे. आता चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला गुंगारा देण्यासाठी केलं की खरोखरच काही राजकारण शिजतयं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us