मोठी बातमी! कोथरूडमधील दलित मुलींवर हिंसाचार प्रकरण, कोर्टाने दिला मोठा आदेश

पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

News Photo   2025 11 11T223214.669

News Photo 2025 11 11T223214.669

कोथरूड मधील दलित मुलींवर हिंसाचार करणाऱ्या पोलिसांवर (Pune) गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पोलिसांसह कोथरूड मधील पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोथरूडच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचं यामध्ये म्हटलं आहे.हे गुन्हे ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल करण्यात आले आहे.

काय घडलं होतं?

पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये होती.

पोलीस या संभाजी नगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळळं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेलx. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version