पुण्यातील उद्योगपतीने ७५० कोटी मोजले : पण, सरकार महालात पाय ठेवू देईना

Cyrus Poonawalla : पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीने मुंबईत तब्बल ७५० कोटी रुपये देऊन महाल विकत घेतला. जवळपास आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, केंद्र सरकार या उद्योगपतीला त्या महालात पाय देखील ठेवू देत नाही. मुख्यतः जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे हा प्रकार घडला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पुनावाला यांच्याबाबत हा […]

Cyrus Poonawala

Cyrus Poonawala

Cyrus Poonawalla : पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीने मुंबईत तब्बल ७५० कोटी रुपये देऊन महाल विकत घेतला. जवळपास आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, केंद्र सरकार या उद्योगपतीला त्या महालात पाय देखील ठेवू देत नाही. मुख्यतः जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पुनावाला यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. सायरस पुनावाला यांनी मुंबईत  लिंकन हाऊस हा महाल २०१५ साली खरेदी केला आहे. परंतु, गेल्या आठ वर्षांपासून केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.

विखे पाटलांचा पवारांवर आरोप : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका… – Letsupp

खरंतर ही जमीन नेमकी कोणाची आहे याबाबत स्पष्टता नसल्याने या व्यवहाराला स्थगिती मिळाली असावी. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं  या जमिनीवर दावा सांगितला आहे. तसेच या जमिनीच्या विक्रीवरूनही भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला होता.

याबाबत सायरस पूनावाला यांनी प्रथमच आपलं मत मांडलं आहे. पूनावाला म्हणाले की, केंद्र सरकारने महालाच्या विक्रीला स्थगिती देण्याबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस तर्क अद्याप सांगितलेला नाही.

केवळ राजकीय हेतूने हा निर्णय घेतला असावा. १२० मिलियन डॉलरइतकी मोठी रक्कम लिंकन हाऊस या महालाच्या खरेदीमुळे अमेरिकेला मोठी रक्कम मिळणार असून हा सर्व पैसा अमेरिकेला जाणार आहे. कदाचित याच गोष्टीमुळे केंद्र सरकारने व्यवहाराला स्थगिती दिली असावी, असे सायरस पूनावाला यांनी सांगितले आहे.

Exit mobile version