विखे पाटलांचा पवारांवर आरोप : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका…

विखे पाटलांचा पवारांवर आरोप : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका…

Radhakrushna Vikhe Patil : दुग्धजन्य पदार्थांची आयात करु नका, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, अशी परिस्थिती नाही. पवार यांनी आधी केंद्र सरकारच्या सचिवालयाकडून माहिती घ्यावी मग बोलावे. उगाच विनाकारण दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आरोग्य राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रातून शरद पवार यांनी दुग्धजन्य पदार्थांची आयात करू नये. कारण त्यामुळे स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल, असे म्हटले आहे.

Thackeray Vs Fadanvis वादावर पाटील म्हणतात ‘कोंबडं आधी की अंडं… – Letsupp

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काहीतरी चुकीच्या माहितीचा आधार घेऊन शरद पवार हे ट्विट करत आहेत. केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे दुग्धजन्य पदार्थांची आयात करत नाही. त्यामुळे शरद पवार हे चुकीचे आरोप करत आहेत. त्यांनी ट्विट करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. आधी केंद्रीय सचिवालयाकडून माहिती घ्यावी मगच बोलावे, असा टोला पवारांना लगावला आहे.

शरद पवार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होईल, असे नमूद केले आहे. पण, त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. पवारांनी लिहिलेलं हे पत्र म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पवार म्हणतात तसा कोणत्याही प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे आधी पवारांनी केंद्राच्या सचिवाकडून माहिती घ्यावी. मगच बोलावे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube