सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, तब्येत स्थिर

पुणे : जगातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Punawala) (वय ८२) यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यता आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं. नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला  मिळालेल्या माहितीनुसार, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा […]

सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Cyrus Punawala

पुणे : जगातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Punawala) (वय ८२) यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यता आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं.

नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यावर डॉ. पूर्वेज ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची तब्येत बरी आहे. रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असं रूबी हॉस्पिटकडून सांगण्यता येत आहे

एमपी-छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान; भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस 

पूनावाला यांच्या तब्येतीबाबत रुबी हॉल क्लिनिककडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली. डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तज्ञांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होत आहे,असं या प्रेसनोटमध्ये सांगण्यात आलं.

सायरस पुनावाला हे पुण्यातील श्रीमंत व्यक्ती आहे. फोर्ब्जच्या शंभर श्रीमंतांच्या यादीत ते सहाव्यास्थानी आहे. 1966 मध्ये त्यांनी सिरम इन्सिट्यूटची स्थापना केली होती. या कंपनीचं मख्यालय पुण्यात आहे. सिरम दरवर्षी गोवर, पोलिओ या लसींचे दिड अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते. सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने COVID-19 लस तयार करण्यासाठी $800 दशलक्ष गुंतवणूक केली. त्यांची लस Covishield ही महामारीच्या काळात भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी लस आहे.

पुनावाला हे उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेतच, पण, त्यांची राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शरद पवारांसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळं शरद पवार त्यांना भेटायला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Exit mobile version