Ajit Pawar News : महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली (Maharashtra Elections) जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. कुणाला किती जागा मिळणार? कोण किती त्याग करणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीदेखील चर्चा होत असलेल्या बातम्यांनी इच्छुकांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. त्यातही मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चांनी नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. महायुतीत खरंच अशा मैत्रीपूर्ण लढती होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तशा चर्चाही आहेत. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. अशा लढती होऊच नयेत असे माझे मत असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या घटकपक्षांत मैत्रीपूर्ण लढती होतील अशी चर्चा आहे, याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर शेजारचा म्हणेल माझ्याकडे का नाही? त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र अजून तरी तशी काहीच चर्चा झाली नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली की अंतिम निर्णय ते घेतील. मी फक्त माझं मत मी तुम्हाला सांगितलं.
पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी
मी अमित शाहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. आम्ही मुंबई विमानतळावर अमित शाहा यांची भेट घेतली होती. परंतु, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नाही. अजित पवार यांनी तर एक महत्वाचा (Ajit Pawar) प्रस्ताव अमित शाहांसमोर मांडल्याची चर्चा होती. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला.
निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीने माझे नाव जाहीर करावे असे त्यांनी अमित शाहांना सांगितले. द हिंदू (The Hindu) या इंग्रजी दैनिकाने अशी बातमी दिली होती. परंतु, या बातमीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट करत अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.