Ajit Pawar : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा मतदारसंघांवर दावा ठोकला. त्यानंतर काल त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघात पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असे वक्तव्य केले. फक्त वक्तव्य करूनच अजितदादा थांबले नाहीत तर आज थेट शिरुर मतदारसंघातच दाखल झाले. मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी काल जे काही सांगितलं तेच फायनल असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. आमचा निर्णय आम्ही घेणार, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो : अजित पवारांनी ठणकावून सांगितले
अजित पवार यांनी आज सकाळीच शिरुर मतदारसंघात भेट दिली. येथील विकासकामांची माहिती घेतली. कालच्या माझ्या वक्तव्याचा आणि आजच्या दौऱ्याचा काहीच संबंध नाही. माझा दौरा नियोजित होता. बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळीच पाहणी दौरा आयोजित केला होता. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ. मी शिरुरबाबत जे काही सांगितलं तेच फायनल आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुणे दौऱ्यात काय म्हणाले होते अजित पवार ?
शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे, मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही.
शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला
पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्षयात्रा सुचते तर कोणाला पदयात्रा सुचते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडायचा अधिकार आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच ते ढेपाळले आणि राजीनामा द्यायला लागले होते. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो, पण आता तुम्ही काळजी करु नका. शिरुरमध्ये पर्याय देणारच आणि तिथे दिलेला उमेदवार निवडणूनही आणणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.