Devendra Fadnavis : गेल्या दीड वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. २०१९ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीला कौल मिळाला होता. मात्र, निवडणुकीनंतर यूती तोडत उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस राष्ट्र्वादीसोबत जाणं पसंत केलं. मात्र, त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. दरम्यान, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. २०१९ साली कट्यार पाठीत घुसली हा प्रयोग झाला. त्यानंतर आम्ही २०२२ प्रयोग केला, अशी राजकीय फटकेबाजी केली.
Sudhir Mungantivar : ‘मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी नाहीतर सिझेरियन करावंच लागतं’
शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात बोलतांना फडणवीस म्हणाले, नाट्य संमलेन, साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो. नेते मंचावर अन् अभिनेते प्रेक्षकांमध्ये अशी बातम्या छापून येतात. मात्र, आम्ही राजकीय मंडळी ३६५ दिवस २४ बाय ७ नाटकंचं करत असतो. शिवाय, पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनाला बोलावलं की, फार वाद व्हायचे. पण अलिकीडच्या काळात हे कमी झालं. कारण, तुमचाही ठाम विश्वास झालाय की, हे नेते मंडळी फार नाटकं करतात, त्यामुळं यांना बोलावलं पाहिजे, असं मिश्किल भाष्य फडणवीसांनी केलं.
ठाकरेंसमोर मिलिंद देवरांचं आव्हान! चर्चेआधीच दक्षिण मुंबईवर दावा केल्यास कॉंग्रेसही दावा करेल अन्…
फडणवीस म्हणाले, राजकीय नेते कायम नाटकं करत असतात. तुम्ही पाहिलं, २०१९ साली कट्यार पाठीत घुसली हा प्रयोग झाला. त्यानंतर आम्हीही २०२२ मध्ये आता होती, कुठं गेली हा प्रयोग केला, प्रयोग यशस्वी झाला, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, राजकारणात तिसरी तिसरी घंटा आचारसंहितेची असते. ती घंटा वाजली की आम्ही पोजिशन घेतो. चांगल्या तालमी केली की प्रेक्षक दाद देतात आणि फक्त नाटकं केली, लोक घरी बसवतात, अशी टीकाही विरोधकावर केली.
मराठी रसिक असेपर्यंत नाटक संपणार नाही
फडणवीस म्हणाले, आधी मुकपट होता, तेव्हाही नाटकं होत होती. त्यानंतर बोलपट आला, तेव्हा वाटलं की, आता नाटक संपेल. पण नाटक संपलं नाही. मग टीव्ही आला तेव्हाही वाटलं की, नाटक संपेल. तेव्हाही नाटक संपलं नाही. आज ओटीटी आलं, तरीही नाटक सुरू आहे. मराठी रसिक असेपर्यंत नाटक संपणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
एआय मानवी संवेदना देऊ शकत नाही
आज आर्टिफिशेअय इंटेलिजन्सचा जमाना आहे. मात्र, एआयकडे भावना नाहीत. त्यामुळं कितीही एआय आलं तरी कला, संगीत, नाटक, सिनेमा याचा त्यावर यावर काहीही फरक होणार नाही. आपण त्याचा वाहक म्हणून उपयोग करू. पण, ते मानवी संवदेना कधीच देऊ शकणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.
वृध्द कलावंतासाठी विशेष योजना लागू करणार
ते म्हणाले, अभिनेता हा नेत्यांच्या निकटचा नसतो, तर प्रेक्षकांच्या निकटत असतो यावेळी निधीची कमतरत पडू देणार नाही. वृध्द कलावंतासाठी विशेष योजना लागू करू, असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रशांत दामले, जब्बार पटेल, उमाताई खापरे, अजित भुरे आदी उपस्थित होते.