Download App

BJP News : जिल्हाध्यक्षांच्या नव्या टीमची घोषणा; पिंपरीची धुरा दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बंधूंवर

Pimpri Chinchwad BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. त्यात उद्योगनगरी अर्थात पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष पदाची धुरा आता दिवंगत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ( Dead MLA Lakshman Jagtap Brother Shankar Jagtap as BJP Pimpri Chinchwad City Chief by Chandrashekhar Bavankule )

Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; काय आहे नेमकं प्रकरण ?

महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची यादी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारला नऊ वर्षपूर्तीमुळे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नेमणुका या रखडल्या होत्या. मात्र, आता पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

NDA किती जागा जिंकणार, लोकसभेत महाराष्ट्रात काय होणार? शिंदेंनी थेट आकडाच सांगितला

आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहराची शहराध्यक्ष पदाची सूत्रे ही भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर होती. मात्र, आता ती शंकर जगताप यांच्यावर असणार आहे. शंकर जगताप हे चिंचवड विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सोबतच आपले थोरले बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी अनेक निवडणुकीमध्ये ते पडद्यामागून मोठी भूमिका ते बजावत होते. शिवाय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शंकर जगताप यांच्या वहिनी अश्विनीताई जगताप या पोटनिवडणुकीमध्ये विजयी होण्यामागे देखील त्यांचा मोठ योगदान असल्याचे बोललं जातं.

दरम्यान, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शंकर जगताप यांनाच तिकीट मिळेल, अशाही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आलं. यावरून शंकर जगतापे नाराज आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी या चर्चामध्ये तथ्य नसल्याचे त्यावेळी सांगितलं होतं.

तर, त्याचवेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शंकर जगताप यांना आपण योग्य सन्मान देऊ, असं आश्वासन दिलं होतं. त्याचीच परिणीती म्हणून त्यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये आणि विशेष करून चिंचवड मतदारसंघामध्ये जगताप कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील भाजप श्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us