Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; काय आहे नेमकं प्रकरण ?

Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; काय आहे नेमकं प्रकरण ?

Gigi Hadid Arrested: हॉलिवूडची (Hollywood) सुपर मॉडेल आणि अभिनेत्री जीजी हदीद (Gigi Hadid ) हिला अमली पदार्थ घेऊन प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सुपर मॉडेल (súper Model) जीजी हदीद अनेकवेळा तिच्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. परंतु यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीजी हदीदला अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gigi Hadid (@gigihadid)


अमली पदार्थ हे या पाठीमागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. जीजी हदीद ब्रेक घेऊन केमन बेटांवर सुट्टी घालवण्यासाठी जात असताना तिने तिच्यासोबत अमली पदार्थ सोबत घेऊन निघाली असल्याचे आढळून आले आहे. यामुळेच तिला अटक करण्यात आली आहे. मात्र, नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. यावेळी जीजी हदीदसह तिची मैत्रिण लीह मॅककार्थी (Leah McCarthy) देखील प्रवास करत होती. कस्टम अधिकाऱ्यांना जीजी हदीद आणि तिची मैत्रिण लीह मॅककार्थी या दोघींकडे देखील अमली पदार्थ सापडले आहेत.

यानंतर त्यांनी कारवाई करत जीजी हदीद आणि लीह मॅककार्थी या दोघींना अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जीजी हदीद आणि लीह मॅककार्थी या दोघी मैत्रिणी खाजगी विमानाने केमन बेटांवर सुट्टी घालवण्यासाठी पोहचले आहेत. दरम्यान सीमाशुल्क अधिकाऱ्यांना त्यांच्या सामानात अमली पदार्थ आणि इतर काही गोष्टी आढळून आपले आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांच्या सामनातील अमली पदार्थआणि इतर नशेचे पदार्थ जप्त करण्यात आल्या आहेत. याच आधारे पोलिसांनी जीजी हदीद आणि लीह मॅककार्थी यांना अटक करण्यात आल्याचे स्थानिक मीडिया दिली आहे.

रणबीर-आलियाबाबत कंगनाचे धक्कादायक आरोप; लग्न केवळ प्रोमोशनसाठी ते वेगळे…

अटकेनंतर त्यांना प्रिजनर डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात  आले होते. जिथे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यावेळी त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आले आहे. तर, कोर्टाने देखील जीजी हदीद आणि लीह मॅककार्थी यांना दोषी ठरवले आहे. दोघांना १ हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर दुसरे कोणतेही आरोप नाहीत. या प्रकरणानंतर जीजी हदीदच्या टीमच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘जीजी वैद्यकीय परवान्यासह न्यूयॉर्कमध्ये कायदेशीररित्या खरेदी केलेले अमली पदार्थ घेऊन प्रवास करत होती. ग्रँड केमनमध्ये २०१७पासून वैद्यकीय वापरासाठी देखील गांजा कायदेशीर करण्यात आला आहे. तिच्याकडे असलेल्या गांजाचे रेकॉर्ड्स उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube