Devendra Fadanvis on Purandar Airport : पुरंदर एअरपोर्ट शिवाय पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळणार नाही. त्यामुळे ते होणे अत्यंत गरजेचे आहे. असं अश्वासन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते पुण्यामध्ये आज विविध प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
कोर्टाचा निकाल अमान्य! आता हायकोर्टात जाणार, पंधरा लाखांची पोटगी मागणार ; करुणा शर्मा
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या दिवशी विजय शिवतारे निवडून आले. त्याच दिवशी मी सांगितलं की, पुरंदर एअरपोर्ट होणार तो आता थांबत नाही. पुरंदर एअरपोर्ट पुण्याच्या विकासाला चार पटींनी पुढे नेणार आहे. कारण पुणे एअरफोर्सची महत्त्वाची सदन कमांड आहे. येथील एअरपोर्टवर देशाच्या सुरक्षेसाठी वर्षभर एअरफोर्सची अॅक्टीव्हिटी चालवली जाते.
अमेरिकन हवाई दलानं भारतीयांना साखळदंडाने का बांधलं? परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं संसदेत उत्तर
त्यामुळे मोठा काळ आपल्याला एअरस्पेस आणि धावपट्टी बंद करून एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावचं लागत. त्यामुळे दुसरं एअरपोर्ट होत नाही तो पर्यंत पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळू शकत नाही. तर आता पुरंदर एअरपोर्टसाठी भूमि अधिग्रहनचा प्रस्ताव सरकारकडे आलेला आहे. त्यासाठी परवाच बैठक झाली. त्याला आता लवकरच परवानगी देऊ. असं म्हणत फडणवीसांनी या अधिग्रहनात कोणावरच अन्याय होणार नाही. असं देखील ते म्हणाले.
‘ऑल द बेस्ट’ नाटकांतून “लागिरं झालं जी” फेम निखिल चव्हाण गाजवणार रंगभूमी
तसेच यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयांच्या इमारती जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही पिंपरी चिंचवडची इमारत सीएसआरच्या माध्यमातून आपण बांधू शकत आहोत. मात्र या परिसरातील कंपन्यांच्या पोलीसांकडून त्रास होत असल्याच्या ब्लॅकमेलींग, वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येतात. हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे त्यात आमचे असो किंवा कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्ते असो त्यांच्यावर थेट मोक्का सारखीच कारवाई करायची असा दमच यावेळी फडणवीसांनी भरला आहे.