कोर्टाचा निकाल अमान्य! आता हायकोर्टात जाणार, पंधरा लाखांची पोटगी मागणार ; करुणा शर्मा
Karuna Sharma : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (Family Court in Bandra) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना दोषी ठरविले आहे. करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केले. तसेच धनंजय मुंडेंना करूणा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र, वांद्र कोर्टाने पोटगीबाबत दिलेला निकाल करुणा शर्मांना मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात (Mumbai High Court) दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन हवाई दलानं भारतीयांना साखळदंडाने का बांधलं? परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं संसदेत उत्तर
करूणा शर्मा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. मी कोर्टाचे खूप आभारी आहे. यापूर्वीही औरंगाबाद न्यायालयात माझा विजय झाला होता. आजही निकाल माझ्या बाजूने आला आहे. कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली. पण, कोर्टाचा हा निकाल मला मान्य नाही. मला पोटगी म्हणून १५ लाख रुपये हवे आहेत. १ लाख ७० हजार रुपये घराचं भाडं आहे. हे भाडे दिले जात नाही. देखभालीचा खर्च दरमहा ३० हजार आहे. दोन लाखांत काय होणार आहे? असा सवाल करुणा शर्मांनी केला.
‘ऑल द बेस्ट’ नाटकांतून “लागिरं झालं जी” फेम निखिल चव्हाण गाजवणार रंगभूमी
माझी मुले माझ्यासोबत आहेत, त्यामुळं तिघांना ५-५ लाख असे १५ लाख रुपये मिळावे, अशी माझी मागणी होती. पण, न्यायालयाने २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. मी या निर्णयाविरोधात हाय कोर्टात दाद मागणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
पुढं त्या म्हणाल्या की, मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहिण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केलाय. मी एकटीच लढत आहे. मी तीन वर्षांपासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडेंवर फडणवीसांचा वरदहस्त…
पोलीस कधीही दारावर यायचे आणि मला ताब्यात घ्यायचे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी मुंबई सोडली. फडणवीसाचा धनंजय मुंडेंवर पूर्वापार वरदहस्त आहे. मुंडे विरोधी पक्षात असतांनाही फडणवीसांचा वरदहस्त होता, असा दावाही करूणा यांनी केला. .