Download App

‘…तर तुमची तिरडी बांधली जाईल’; हिंदुराष्ट्राची मागणी करताना बागेश्वर बाबांचं मोठं विधान

Bageshwar Baba : तुम्ही राम यात्रेवर दगडं फेकणार असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असं विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांनी(Bageshwar Baba) केलं आहे. बागेश्वर बाबा सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अंधश्रद्ध निर्मूलन समितीने कडाडून विरोध दर्शवला होता. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली होती. त्यामुळे बागेश्वर बाबांचा पुण्यातील कार्यक्रम चर्चेला विषय ठरत आहे.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते, आरटीआयमधून उघड

बागेश्वर बाबा म्हणाले, आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला. मीदेखील संविधानाचा स्वीकार करतो. पण संविधानात आतापर्यंत 125 वेळा घटनादुरुस्ती झाल्या आहेत. आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं असून लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असं विधान बागेश्वर बाबांनी केलं आहे.

तसेच हिंदुराष्ट्र स्थापन झाल्यास इतर धर्मियांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता असल्याचंही बागेश्वर बाबांनी स्पष्ट केलं आहे.

Raymond चे चेअरमन 32 वर्षांनी पत्नीपासून विभक्त; तब्बल 75 टक्के संपत्ती देण्याची केली मागणी

हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही. हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असंही बागेश्वर बाबा म्हणाले आहेत.

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार कार्यक्रम पुण्यात होत आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, कार्यक्रम सुरू होण्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला होता. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीही विरोधात उतरली होती.

बागेश्वरच्या बाबांचे दावे घटनाविरोधी आणि अशास्त्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीकडून करण्यात आली होती. राज्यात दहा वर्षांपासून जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्याचे उल्लंघन बागेश्वरच्या बाबांकडून होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली. मात्र, पोलिस प्रशासनाकडून बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे.

Tags

follow us