Raymond चे चेअरमन 32 वर्षांनी पत्नीपासून विभक्त; तब्बल 75 टक्के संपत्ती देण्याची केली मागणी

Raymond : रेमंड (Raymond) या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅंडचे चेअरमन गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी आपल्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यांचं 32 वर्षांचं वैवाहिक आयुष्य यामुळे संपुष्टात आलं आहे. नवाज मोदी सिंघानिया असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. तर त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांना त्यांच्या पत्नीला पोटगी म्हणून तब्बल आपली 75 टक्के संपत्ती द्यावी लागणर आहे.
तब्बल 75 टक्के संपत्ती पत्नीला द्यावी लागणार…
गौतम सिंघानिया यांना घटस्फोटानंतर त्यांच्या पत्नीला पोटगी म्हणून तब्बल आपली 75 टक्के संपत्ती पत्नीला द्यावी लागणार आहे. यामध्ये तिने तिच्या दोन मुलींसाठी देखील ही संपत्ती मागितलेली आहे. निहारिका आणि निशा या त्यांना दोन मुली आहेत. तर गौकम यांना तब्बल 1.1 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 11 हजार कोटींची संपत्ती आहे. ज्यामधून त्यांना तब्बल आपली 75 टक्के संपत्ती पत्नीला द्यावी लागणार आहे.
World Cup Final : ट्रेविस हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खरतनाक होता है’!
दरम्यान या प्रकरणामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, गौतम सिंघानिया यांनी आपल्या पत्नीच्या या मागणीची पूर्तता करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र यावेळी गौतम यांनी एक फॅमिली ट्रस्ट बनवण्याचा सल्ला त्यांच्या पत्नीला दिला. ज्याचे एकमेव ट्रस्टी गौतम सिंघानिया असतील आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना त्यांची संपत्ती मिळेल. मात्र या सल्ल्याला सिंघानिया यांच्या पत्नीने नाकार दिला आहे.
ICC साठी रोहितचं ‘बेस्ट’ कॅप्टन; दोन ट्रॉफीज् मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला बाहेरचा रस्ता
तर सिंघानिया दांपत्याच्या या घटस्फोटाचे प्रकरणामध्ये गौतम यांच्या बाजूने खेतान अँड कंपनी यांचे सीनियर पार्टनर हैग्रीव खेतान हे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या बाजूने मुंबईतील लॉ फर्म रश्मिकांत यांना नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणामध्ये आणखी एक पार्टनर समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज सिंघानिया यांचे 32 वर्षांचा वैवाहिक आयुष्य आहे. मात्र यावर्षीच्या दिवाळी दरम्यान गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी आपण आपल्या पत्नीपासून विभक्त होत असल्याचा जाहीर केलं. दरम्यान यामध्ये ते आपल्या रेमंड कंपनीच्या चेअरमन पदाचा राजीनामा देणार आहेत की, नाही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.