‘द कम्ल्पिट मॅन’ बनवणाऱ्या रेमंडची ‘गगन’ भरारी; डिफेंस, EV अन् एयरोस्पेस क्षेत्रात ठेवलं पाऊलं

  • Written By: Published:
‘द कम्ल्पिट मॅन’ बनवणाऱ्या रेमंडची ‘गगन’ भरारी; डिफेंस, EV अन् एयरोस्पेस क्षेत्रात ठेवलं पाऊलं

Raymond Group enterder in EV and Aerospace: कपड्यांचा प्रसिध्द ब्रॅंड रेमंड कंपनी विविधांगी क्षेत्रात पाऊल टाकत आहे. कंपनीने आज मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (MPPL) मधील 59.25 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. कंपनीने जाहीर केले आहे की ते MPPL मधील हिस्सेदारी एकूण 682 कोटी रुपयांना विकत घेत आहे. या घोषणेमुळं रेमंड समूह इलेक्ट्रिक वाहने, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

युपी पोलीसांनी पछाडले जंग-जंग, पण Elvish Yadav ने व्हिडीओद्वारे… 

या आर्थिक वर्षात अधिग्रहन प्रक्रिया पूर्ण होणार
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रेमंड ग्रुपने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, रेमंड ग्रुपला आशा आहे की, त्यांना सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेडमधील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्यात यश मिळेल. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये असंही सांगितले आहे की, एमपीपीएलमधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी कंपनी आपल्या संस्था आणि कर्ज या दोन्हींची मदत घेत आहे.

तीन कंपन्यांचे विलीनीकरण करून नवीन उपकंपनी
रेमंडची ही अधिग्रहन प्रक्रिया JK Files and Engineering Limited (JK Files) च्या उपकंपनीच्या मदतीने पूर्ण केली जाईल. या अधिग्रहनानंतर रेमंड समूह जेके फाइल्स, आरपीएएल आणि एमपीपीएलच्या व्यवसायांना एकत्र करून NEWCO नावाची नवीन उपकंपनी तयार करेल. यामध्ये रेमंड समूहाची 66.3 टक्के भागीदारी आहे.

रेमंड कंपनीने MPPL ची हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया म्हणाले की, या अधिग्रहणानंतर कंपनी एरोस्पेस, संरक्षण आणि ईव्ही क्षेत्रातही प्रवेश करेल. रेमंडने नेहमीच ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन दिले आहे. गौतम सिंघानिया, रेमंडने नवीन क्षेत्रात पाऊल टाकतांना मला आनंद होत आहे. घोषणा करताच कंपनीचे शेअर्स 4% वाढले.

एमपीपीएलबद्दल बोलायचे झाले तर या कंपनीचे एकूण 11 उत्पादन कारखाने आहेत. ही कंपनी एरोस्पेस, डिफेन्स आणि ईव्ही सारख्या क्षेत्रात काम करते. याशिवाय वर्षानुवर्षे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कार्यरत आहे. रेमंडला आशा आहे की एमपीपीएलचे अधिग्रहण केल्यानंतर ही कंपनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही बाजारपेठांमध्ये मोठी करण्यात यशस्वी होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube