Video : ‘माझ्या खाण्यापिण्यावर इंदापूर-पुरंदरमधील पुरुषांच लक्ष, अमित शाहांकडे तक्रार करणार’

Supriya Sule on Vijay Shivatare : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. […]

Untitled Design

Untitled Design

Supriya Sule on Vijay Shivatare : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

खासदार सुप्रिया सुळे ह्या दौंडच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वियय शिवतारे यांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी नॉनव्हेज खाल्ले नाही. कोणी आरोप केला आहे मला माहित नाही. मी अमित शाह यांच्याकडे विनंती करणार आहे की मी काय खाते आणि काय पिते याकडे इंदापूर आणि पुरंदर मधील अनेक पुरुष लक्ष ठेवून आहेत.

सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा पण… Jayant Patil यांच्या ED चौकशीवर पवार बोलले

माझ्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हा माझ्यावर अन्याय आहे, त्यामुळे मला सुरक्षा दिली पाहिजे. जे पुरुष माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना अटक करावी. मी इंदापूरमध्ये काय खाल्ले हे त्यांना कसे माहिती? त्यादिवशी मी व्हेज खाल्ले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्या पुढं म्हणाल्या की माझं सकाळी जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले. चौकशी आमच्यासाठी नवीन नाही. शरद पवारांनादेखील अशी नोटीस पाठवली होती त्यानंतर महारष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती आहे. हे दडपशाहीचं सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात. आधीची सरकारे होती त्यावेळी त्या स्वायत्त संस्था होत्या. आता अदृश्य हात या संस्था चालवतो, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

Exit mobile version