Ganeshotsav Pune : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav Pune) पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांकडून डीजे साऊंड सिस्टिमची चाचणी करण्यात आलीयं. पुण्यात पर्यावरप्रेमींसह अनेकांचा साऊंड सिस्टिमला विरोध आहे तर काहींचं समर्थन आहे. गणेशोत्सवात डीजे सिस्टिमवर निर्बंध येऊ नये, म्हणून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आयुक्तालयात डीजे सिस्टिमची चाचणी करण्यात आलीयं. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे यांच्यासह पुणे साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी उपस्थित होते.
अजितदादांनी बीडकरांना दाखवलेल्या विकासस्वप्नांची वीट चढतेय; ‘सी-ट्रिपलआयटी’ची गतीने उभारणी
या चाचणीदरम्यान, साऊंड सिस्टिममधून येणाऱ्या आवाजाची पातळी डेसिबल मॉनिटर मशीनने मोजण्यात आली. यावेळी किती साऊंड लावल्याने आवाजाची क्षमता कशी वाढते, आवाजात का फरक पडतो? एवढंच नाही तर साऊंडमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या प्रेशर मिडबद्दलही पोलिसांनी माहिती घेतली आहे. पर्यावरण कायदा, ध्वनी प्रदूषणाबाबत जो कायदा आहे आणि त्या अनुषंगाने जे डेसिबल ठरवून दिलेले आहेत, त्याचे पालन येणाऱ्या उत्सवात व्हावं यासाठी आज साउंड सिस्टिमची चाचणी झाली. साउंड सिस्टिमचे प्रकार नेमके कोणते आहेत? त्यात काय काय “कष्टमायझेशन” केले आहेत याबद्दलही चाचणी करण्यात आलीयं. या चाचणीनंतर सविस्तर चर्चा केली करुनच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी; आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद Live
सध्या स्पीकरमध्ये “प्रेशर मिड” नावाची एक मशीन लावली जाते. या मशीनमुळे क्षमतेपेक्षा मोठा आणि त्रास होईल असा आवाज केला जातो. या आवाजामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल आम्ही संघटना म्हणून स्वतः विरोध करतोयं. हे मशीन एका साउंड म्हणजे स्पीकर बॉक्समध्ये फिट केलं जातं आणि असे अनेक बॉक्स लावले जातात जे घातक आहेत. आमचा या मशीनला विरोध असून कायद्याच्या चौकटीत राहुनच उत्सव साजरे करायचे असल्याचं डीजे व्यावसायिकांनी स्पष्ट केलं आहे.
‘प्रेशर मिड’ नेमकं काय असतं?
सध्या डीजे साउंडमध्ये प्रेशर मिड नावाच्या मशीनचा वापर सर्रास ठिकठिकाणी केला जातोय. ही मशीन स्पीकरमध्ये लावल्यावर त्याचा आवाज इतरांपेक्षा जास्त असतो. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहेत. एखाद्या कार्यक्रमात जेव्हा डीजेच्या साउंड सिस्टिम म्हणजेच स्पीकरमधून एकदम कर्कश आवाज येतो. जो मूळ आवाजापेक्षा वेगळा आणि कानाला त्रास देणारा असतो. तेव्हा या स्पीकरमध्ये “प्रेशर मिड” लावलेले असते. हे “प्रेशर मिड” एक यंत्र आहे जे तयार केलं जातं आणि अनेक स्पीकरमध्ये सहजपणे फिक्स केलं जातं. काही वेळा आपण जे लाकडी स्पीकर असतात त्यात तर ते अगदी सहजपणे लागू शकतं. हे यंत्र साउंड ड्रायव्हर म्हणून काम करतं जे साधारण स्पीकरच्या आवाजाच्या पातळीपेक्षा तिप्पट ते चौपट असतं,” अशी माहिती साउंड सिस्टिम व्यावसायिकाने दिली आहे.
